सरीसृप- तस्कर साप (बिनविषारी)

तस्कर या सापाच शास्त्रीय नाव Elaphe helena आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट स्नेक असे म्हणतात. हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. या सापाचा वावर मुख्यतः श्रीलंका, पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात आहे. हा साप महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळतो. तस्कर सापाला शहरी साप म्हंटले जाते. छोटी जंगले, गाव, शहरे, आडगळीच्या जागा ह्या तस्करच्या आवडत्या जागा आहेत.

तस्करचा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा असा होतो. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. व जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढऱ्या चौकोनांनी भरलेले असतात.

याचे मुख्य खाद्य उंदीर आहे. या सोबतच तो पाली, सरडे, पक्ष्यांची अंडी, बेडूक हे पण खातो. माणूस, मोठे शिकारी, पक्षी, मुंगूस, मोठे साप इत्यादी पासून त्याला धोका आहे. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. पण प्रतिकारासाठी हा अंग फुगवून चावा घ्यायचा प्रयत्न करतो.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा