आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नव्हे -छगन भुजबळ

पुणे, १४ सप्टेंबर २०२३ : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजातील विविध समाज घटकांवर बोलताना, आरक्षण म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नव्हे असं मत व्यक्त केलं. तसेच बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही आपली पूर्वीपासूनची मागणी अजूनही कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका मराठी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना सध्याच्या परिस्थितीवर हे मत व्यक्त केल. वेगवेगळ्या समाज घटकांककडून आरक्षणाची मागणी होत आहे, परंतु आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नसुन आरक्षण म्हणजे हजारो वर्षांपासून जे दबले-दडपले गेले होते त्यांना समान पातळीवर आणण्याचा कार्यक्रम आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. ते म्हणाले, सर्व समाजांचे आरक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठी जातिनिहाय जनगणना केली पाहिजे. या आधीपासून आम्ही केंद्र सरकारकडे तशी मागणी केली आहे. जातीनिहाय जनगणना केली तर, कोणाची किती लोकसंख्या आहे ते कळेल. बिहार व इतर काही राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे.

जालन्यातील लाठीचार्जनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले वातावरण शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी माफी मागतली, त्यात वावगे काहीच नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले. तर दुसरीकडे, जालन्याच्या आंतरवाली सराटीत सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर १७ व्या दिवशी तोडगा निघाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून शरबत घेऊन जरांगेंनी आपले उपोषण सोडले. यामुळे शिंदे सरकारपुढील एक मोठा प्रश्न सुटला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा