ब्रिटनमध्ये राजीनामा सत्र सुरु….

पुणे ६ जुलै २०२२ : महाराष्ट्रातलं राजीनाम्याचं सत्र संपल आणि ब्रिटनमधल्या मंत्रिमंडळात राजीनामा सत्र सुरु झालं. नुकताच ब्रिटनचे अर्थ मंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जावेद यांनी राजीनामा दिला. ऋषी सुनक यांनी राजीनामा देताना प्रधानमंत्री बोरिस जॅान्सन यांच्याविषयीची नाराजी बोलून दाखवली. त्यांनी सांगितले की लोकांना सरकारकडून चांगल्या कामांची अपेक्षा असते.आता आमचा बोरिस जॅान्सन या सरकारवर विश्वास नाही. हे सरकार राष्ट्राच्या हितासाठी काम करत नाहीं. असं सांगून त्यांनी राजीनाम्यावर शिक्का मोर्तब केले.

त्यांच्या जागी बोरिस जॅान्सन यांनी शिक्षण मंत्री नादिम जहावी यांना अर्थ मंत्री तर स्टीव बार्सली यांना आरोग्य मंत्री म्हणून घोषित केले.
एकुणातच जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर तुम्हाला सरकार , मंत्रिमंडंळ आणि राजीनामे पहायला मिळतील, हेच वास्तव आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी-तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा