सनातनवरील टीकेला जशास तसे उत्तर द्या- पंतप्रधानांचा आदेश, ‘इंडिया-भारत’ वर भाष्य नको

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर २०२३ : सनातन धर्मांचा अवमान करणाऱ्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिले आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी रविवारी सनातन धर्मावर टीका केली होती. यावरून वादाला तोंड फुटले आहे. भाजपने विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला टार्गेट केले आहे.

काँगेसने मात्र सर्व धर्म समान असून, प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार असल्याचे सांगून या घटनेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी G-20 परिषदेत आयोजित केलेल्या मंत्री परिषदेत, सनातनाचा अवमान करणाऱ्यांना जबाबदारीने चोख प्रत्युत्तर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. विरोधाकांना सनातन धर्माच्या वास्तवाची माहिती करुन द्यावी, असेही मोदी यांनी सांगितले आहे.

इंडिया-भारत नावावरुन विरोधकांनी काहुर माजविले असले, तरी या विषयावर भाष्य न करण्याचेही मोदी यांनी मंत्र्यांना सांगितले. सनातनमधील प्रथा या डेंग्यू आणि मलेरियासारख्या असल्याने सनातनचे समूळ उच्चाटन करायला हवे, असे विधान उदयनिधी यांनी केले होते. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्धाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित केलेले नाही. यातून केंद्र सरकारच्या सनातनी मनोवृत्तीचे दर्शन घटते, अशी टीकाही विरोधाकांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा