गोल पोस्ट समाजकारण शहीद जवानच्या मुलांची घेतली पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी. – आ. प्रा. डॉ. तानाजीराव...

शहीद जवानच्या मुलांची घेतली पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी. – आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत.

सोलापूर, २९ जून २०२० : मायभूमीचे रक्षण करतांना बार्शी तालुक्यातील पानगाव मधील शूर जवान सुनील दत्तात्रय काळे यांना वीरमरण प्राप्त झाले. जम्मू काश्मीर येथे पुलवामा येथील बंडजु या भागात भारतीय जवान आणि अतिरेक्यांच्या चकमकीत सुनील काळे हे शहीद झाले. त्यांच्या परिवाराचे सांत्वन करत आमदार तानाजीराव सावंत यांनी त्यांना आधार दिला. आज दिनांक २९ जून रोजी, आमदार तानाजीराव सावंत यांनी शहीद जवान सुनील दत्तात्रय काळे यांच्या मुलांची पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी त्यांनी स्वतः घेतल्याचे त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरून माहिती दिली. सोबतच, शहीद जवान सुनील काळे यांच्या परिवाराच्या मागे मी नेहमीच खंबीर उभा राहील, असा विश्वास देखील त्यांनी दिला.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

error: Content is protected !!
Exit mobile version