मौदा, नागपूर, २ फेब्रुवारी २०२४ : सेवानिवृत्ती हा आयुष्यातला नवीन टप्पा आहे. ‘याच टप्प्यात आनंदाचा शोध घेत मार्गक्रमण करणे’ हेच निवृत्तीनंतरचे कार्य असल्याचे विचार सेवानिवृत्त तलाठी मनोज सुंदरे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील धानला येथे जवळपास १० वर्ष मनोज सुंदरे यांनी तलाठी पदाचा कार्यभार चांगला सांभाळला काल ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा अनेकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावातून त्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या सेवेमुळे अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सुंदरे हे अतिवृष्टीमध्ये अनेकांच्या शेतात जाऊन पिकांचे प्रत्यक्ष पाहणी करून संबधित विभागाला अहवाल सादर करायचे. अनेकांना त्यांनी शासकीय अधिकारी यांच्याकडून मदतही मिळवून दिली. या १० वर्षात त्यांनी कोणत्याच शेतकऱ्याला किंवा कोणत्याच नागरिकांना न दुखवता मदत करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. म्हणूनच सेवानिवृत्ती हा आपल्या आयुष्यातला नवीन टप्पा असल्याचे विचारही त्यांनी मांडले.
धानला येथील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि इतरांच्या वतीने त्यांचा सेवापूर्तीनिमित्त मनोज सुंदरे यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित उपसरपंच अजय हारोडे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष सार्वे, ग्रामसेवक तातोबा कुंड, सूर्यकांत रोडे, पत्रकार अजय मते, राजू आंबीलकर, मोनिष मेश्राम, चेतन रोडे, कुमार घंटा, जितेंद्र सावरकर, वसंता मोथरकर, मनोज वरठी, रमेश चव्हाण, नरेश हारोडे. रोशन भोयर, पिंटू हेदाऊ, आशीष मते, सुरेश हारोडे, डुलीचंद ठोंबरे, वामन मुंदेकर, जितेंद्र डांगरे, ईश्वर पत्रे, गौतम मेश्राम, राजेश हारोडे, विनोद शेंडे, रामचंद्र राजगिरे, हिरा वंजारी आणि कल्पेश वैरागडे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अजय मते