चित्याचे भारतात पुनरागमन

मध्यप्रदेश : ९ऑगस्ट २०२२; भारताच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामधून भारतात येणार आहेत १२ चित्ते.

चित्यांसारख्या मोठ्या मांसाहारी प्राण्यांना एका खंडातून दुसऱ्या खंडात हलवण्याचा आणि जंगलात ठेवण्याचा हा जगातील पहिला प्रकल्प असल्याचे म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते या प्रकल्पात संशोधनाच्या खुप संधी मिळतील.

दोन दशकांहून अधिक काळ चित्यांचा सखोल अभ्यास करणाऱ्या एका प्राध्यापकाने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताच दुसऱ्या दिवशी या चित्यांना भारतात पाठविले जाईल. मध्यप्रदेशातील कुनो पालनपूर या राखीव वन्य जीव क्षेत्रात ह्या चित्यांचा समूह दाखल होणार आहे.

गेल्या महिन्यात, भारत आणि नामिबियाने १९५२ मध्ये भारतातून नामशेष घोषित केलेला चित्ता भारतात पुन्हा आणण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार नर आणि मादी चित्त्यांची पहिली तुकडी नामिबियातून १५ ऑगस्टपर्यंत भारतात पोहोचेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा