जालन्यात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन

जालना २९ जुलै २०२४ : महसूल विभागातंर्गत जालना जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांद्वारे महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. विभागातंर्गत विशेष मोहीम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे आणि महसूल अदालतीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

महसूल सप्ताहात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करून महसूल सप्ताह शुभारंभ करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचे शिबीर २ऑगस्ट, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ३ ऑगस्ट, मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना ४ ऑगस्ट, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय ५ ऑगस्ट, सैनिक हो तुमच्यासाठी ६ ऑगस्ट, एक हात मदतीचा-दिव्यांगाच्या कल्याणाचा ७ ऑगस्ट असे कार्यक्रम आणि महसूल संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संवाद कार्यक्रम घेवून महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा