शिरूर, दि. ०२ ऑक्टोबर २०२०: शिरूर तालुक्यातील प्रत्येक खाजगी कॉविड केअर सेंटर हॉस्पिटल येथे शासनाने कोविड करिता नेमून दिलेले दर रुग्णालयाच्या प्राथमिक बाजूस लावावे, व कोरोना बाधितरुग्ण यांच्याकडून जास्त दर आकारणाऱ्या हॉस्पिटलबाबत त्वरित प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करावी असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.
हॉस्पिटलचे ऑडिट केले जाईल व संबंधित रुग्णाला जास्त असलेली रक्कम पुन्हा परत देण्यात येणार आहे. यासाठी वेगळे अधिकारी शासनाच्या वतीने नेमण्यात आले आहेत. शिरूर येथील तहसीलदार कार्यालय सभाग्रहात आमदार अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली व शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक घेण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत ५२ हॉस्पिटलचे प्रस्ताव प्रलंबित असून, हे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासंदर्भात पाठपुरावा करनार असल्याचेही खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. व विभागीय आयुक्तांची डॅशबोर्ड माहिती प्रत्येक नागरिकांना मिळवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी व शासकीय हॉस्पिटलची बेडची उपलब्ध माहिती ऑक्सीजन बेड ची माहिती व्हेंटिलेटरची माहिती उपलब्धता नुसार मिळणार आहे. त्यामुळे उपचार लवकर रुग्णाला मिळतील असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगून हा विभागीय आयुक्तांच्या डायकोर तीन महिन्यापासून ऍक्टिव्ह झालेला आहे असेही त्यांनी बोलताना सांगितले आहे.


शिरूर तालुक्यातील पाबळ येथे चाळीस ऑक्सीजन बेडचे कोरोना उपचार केंद्र लवकरच सुरू करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांना दिले आहेत. व कोरोना लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित कोरोना रॅपिड टेस्ट करावी पॉझिटिव्ह आढळल्यास लवकर उपचार सुरू करावेत नागरिकांनी लक्षणे दिसल्यास अंगावर काढू नये असा सल्लाही यावेळी खासदार कोल्हे यांनी देऊन रॅपिड टेस्ट निगेटिव असली तरी लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी कोरोना स्वब तपासणी करून घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला असून शिरूर तालुक्यात मांडवगण फराटा, व शिक्रापूर, या दोन ठिकाणी खाजगी हॉस्पिटल यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू असून शिरूर शहर व परिसरातील काही हॉस्पिटल येथे या योजना लवकर सुरू कराव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगून पुणे येथील खाजगी कोविड हॉस्पिटल येथे प्रत्येक हॉस्पिटल येथे एका अधिकाऱ्याची नेमणूक केली असून बेड उपलब्धतेनुसार माहिती तालुका लेवलवर उपलब्ध आहे.
प्रत्येक नागरिकांनी कोरोना लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी अंगावर काढू नये त्यामुळे व्हेंटिलेटर परत जाण्याची वेळ येत आहे. लवकरच या आजाराचे निदान झाल्यास व्हेंटिलेटर ची गरज पडत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेवून औद्योगिक व वैद्यकिय वापरासाठी ऑक्सिजन वापराचे धोरण ठरविण्यात आले असून वैद्यकिय वापरासाठी ८५% व औद्योगिक साठी १५% असे प्रमाण ठरविण्यात आल्याचे कोल्हे यांनी सांगून मृत्यू दर ४ टक्के होता तो २.२९ टक्के एवढा आला आहे.


शिरूर तालुक्यात साडेसातशेच्या वर कोविड रूग्णांसाठी बेड उपलब्ध असून आजपर्यंत केवळ १५० च्या आसपास रुग्ण कोविड सेंटरमध्ये आहेत. व ६०० बेड उपलब्ध असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगून पाबळ येथे ऑक्सीजन बेड व शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. शिरूर तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू होणार असून यासाठी प्रत्येक भागात दोन स्वयंसेवक शासकीय कर्मचाऱ्या साठी लागणार असून यामुळे त्या भागातील कोणीही नागरिक तपासणी वाचून वंचित राहता कामा नये हा मुख्य हेतू असल्याचेही शिरूर प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख, यांनी सांगून तालुक्यातील व शहरातील कंपनी कामगारांची रॅपिड टेस्ट घेणे गरजेचे आहे. परंतु ऑक्सिजन आणि टेंपरेचर व लक्षणे यापैकी दोन गोष्टी असल्यास त्याची टेस्ट करण्यात येते सरसकट टेस्ट करण्यासाठी एवढ्या किट शासनाकडे उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, शिरूर प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोरे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, बाजार समिती संचालक राजेंद्र गावडे, शिरुर नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, पंचायत समितीच्या अध्यक्षा अरुणाताई घोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र काळे, आंबेगाव राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शेखर पाचुंदकर, शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, नगरसेवक मंगेश खांडरे, मनसेचे मेहबूब सय्यद, अनील बांडे, रंजन झांबरे, स्वच्छता आरोग्य सभापती विठ्ठल पवार, नगरसेवक नगरसेविका रोहिणी बनकर, ज्योती लोखंडे, रेश्मा लोखंडे, यांची उपस्थिती होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे