कोविड-१९ च्या संदर्भातील पुण्याच्या विधानभवनात शरद पवारांसोबत आढावा बैठक

पुणे, २६ जून २०२० : आज विधानभवन पुणे येथे कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड,आंबेगाव,जुन्नर ,शिरुर,
हडपसर भागात वाढणाऱ्या रुग्णांची माहिती तसेच सुरू असणाऱ्या उपाययोजना यांची प्रशासकीय अधिका-यानी माहिती दिली.

कोविड-१९ च्या केवळ टेस्टिंगवर अवलंबून राहण्यापेक्षा चेस्ट सिटी स्कॅनचा उपयोग केल्यास , कोरोना रोगाची गंभीरता लवकर आयडेंटिफाय होऊन त्याचा उपयोग मृत्युदर कमी होण्यासाठी होऊ शकेल असा प्रमुख मुद्दा उपस्थित केला. कोरोनवर फॅबिफ्लु या टॅबलेट संदर्भात जी क्लिनिकल ट्रायल करण्यात आली तसेच प्रसिद्ध करण्यात आली त्यावरती प्रश्नचिन्ह आहे. या गोळीची किंमत १०३ रुपये आहे, याचा अर्थ संपूर्ण उपचारासाठी येणारा खर्च १२,५०० आहे , याउलट सारखेच कंटेंट असलेल्या जेनेरिक टॅबलेट खर्च २०० रुपये आहे, यामुळे ग्लेनमार्कचा वापर आपण किती करावा याचा विचार व्हावा अशी मागणी केली.

तसेच खाजगी लॅब,टेस्ट अहवाल फायद्यासाठी पॉझिटिव्ह देतात तोच अहवाल शासकीय लॅब निगेटिव्ह देतात यामुळे नागरिकांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यामुळे खासगी लॅबच्या विश्वासार्हतेकडे लक्ष देण्याची प्रमुख मागणी केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा