बार्शी, १७ ऑगस्ट २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक हवालदिल झालेले आहेत. कामधंदे व्यवस्थित चालत नसल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये गावोगावी जाऊन नागरिकांशी भेटून, त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे सत्र सतत चालू आहे.
कोरोनाच्या या महामारीच्या काळात प्रशासन या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. जनतेच्या हितासाठी प्रशासन नवनवीन योजना तसेच नियम काढत आहेत. अशा मध्ये, गावोगावी जाऊन नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्याचे निवारण करण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर हे सतत प्रयत्न करत आहेत.
आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी बार्शी तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्ण आढळलेल्या गावांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच, या परिस्थिती मध्ये घाबरून जाऊ नये, तर स्वत:ची आवश्यक ती काळजी घ्यावी आणि प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले. यासोबतच, कंटेन्मेंट भागातील नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घ्यावी अशा सूचना देखील त्यांनी प्रशासकिय यंत्रणेस दिल्या.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड