पुणे, दिनांक २७ सप्टेंबर २०२२ : पुणे शहराचे उपनगर असलेल्या हडपसर येथे रिक्षाचालकाला बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर येथे घडलीआहे. या प्रकरणात हडपसर पोलिसांकडून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सदर प्रकरणात कृष्णा विठ्ठल रेखले २७, रा. कवडीपाट टोल नाका, लोणी काळभोर असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. सागर राहुल गायकवाड २४, रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, हडपसर असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षदा प्रतीक वाघमारे २२, रा. शांतीनगर वसाहत, हडपसर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गायकवाड आणि रेखले हे दोघेही रिक्षाचालक आहेत.
सदर घटना घडल्यानंतर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलीस ठाण्याचे गुन्हेशाखा पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर