हक्काचे पाणी आंबेगावला देणार नाही, आमदार दिलीप मोहिते पाटीलांचा इशारा

वाडा, २ ऑगस्ट २०२३: डिंबे धरणातील पाणी अहमदनगरमधील इतर तालुक्यांना देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. ते पाणी आंबेगाव तालुक्याच्या पठार भागाला द्या, मात्र माझा तालुका पाण्यापासून वंचित ठेवू नका. वेळप्रसंगी राजकारणाचा त्याग करण्याची वेळ आली तरी मी करेन. माझ्या तालुक्यातील जनतेच्या हितासाठी रक्त सांडायची वेळ आली तरी मी करेन, कसल्याही परिस्थितीत आमच्या हक्काचे पाणी आम्ही आंबेगावला जाऊ देणार नाही. अशी परखड भूमिका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मांडली आहे.

कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मोहिते पाटील यांच्या हस्ते धरणांतील जलसाठ्याचे पूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कळमोडी धरणातील पाणी आंबेगाव तालुक्याला नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वीही आम्ही त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे.

कळमोडी धरणांचे पाणी आमच्या हक्काचे असून, एक इंचही पुनर्वसन आंबेगाव तालुक्यात झालेले नाही. त्यामुळे या पाण्यासाठी आम्हाला कालही संघर्ष करावा लागला, आजही आहे तर उद्याही करावा लागणार आहे. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, उपसभापती विठ्ठल वनघरे, माजी सभापती सुरेश शिंदे आदींसह कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा