रिंगरोडबाबत केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार : खा. डॉ.अमोल कोल्हे

198

हडपसर/पुणे : हडपसर परिसरातील वाहतूक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नागरिक व वाहन चालक प्रचंड त्रस्त झाले आहेत. तात्पुरती उपाययोजना करण्यापेक्षा प्रलंबित बहुचर्चित रिंगरोड करण्यास प्राधान्य देणार आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.
हडपसर येथे एका संस्थेच्या कार्यक्रमात आले असता, डॉ. अमोल कोल्हे यांनी uncut news शी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुयारी मार्ग या संदर्भात आपली भूमिका मांडली. हडपसरच्या प्रश्नाबाबत आमदार चेतन तुपे पाटील विधानसभेत जोरदार आवाज उठवून पुण्याच्या प्रशनांकडे लक्ष वेधत असल्याचा उल्लेख ही त्यांनी केला. तसेच येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण गंभीर आहे. केंद्रीय मंत्र्याकडे पाठपुरावा करून रेल्वे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल व रिंगरोड बाबत आग्रही भूमिका घेणार असल्याचे सांगितले. हडपसरकरांची वाहतुककोंडीमधून सुटका होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा