कटक: सतत खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या ऋषभ पंतने वेस्ट इंडिजविरुद्ध निश्चितच काही शानदार खेळी खेळली. पण त्याची विकेटकीपिंग फारशी चांगली राहिली नाही. या मालिकेत पंतने फलंदाजीत चांगली कामगिरी केली होती, असं वाटत होतं की तो लयीत येत आहे, पण पंतने ज्या प्रकारे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपली फलंदाजी आणि विकेटकीपिंग दाखविली आहे, त्याचे चाहते आणि क्रिकेट विश्व आश्चर्यचकित आहे. पंत सोशल मीडियावर खूपच गर्विष्ठ आहे.
यावेळी त्यांनी एक किंवा दोन नव्हे तर तब्बल तीन झेल सोडले आहेत. जडेजाच्या लागोपाठ दोन चेंडूंवर ऋषभ ने दोन झेल सोडले. तसेच त्याने एक झेल कुलदीप यादव याच्या चेंडूवर सोडला. पहिला झेल पंतने १६ व्या षटकात सोडला. यानंतर त्याने हेटमायरचे दोन झेल सोडले. यानंतर पंत जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा त्याने ७ धावांच्या वैयक्तिक धावात विकेट गमावली. बाद झाल्यावर दुसर्या टोकाला उभे असलेल्या विराट कोहलीने निराशा व्यक्त केली.
या संपूर्ण मालिकेत टीम इंडियाची फलंदाजी आणि गोलंदाजी कदाचित शानदार राहिली असेल, परंतु फील्डिंगने सर्वांनाच निराश केले आहे. खेळाडूंनी यावेळेस सोप्यातल्या सोपे झेल सुद्धा सोडले आहेत. भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी -२० आणि एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत १८ झेल सोडले आहेत. मात्र, टीम इंडियाने विंडीजविरुद्ध टी -२० मालिका २-१ने जिंकली. यानंतर टीम इंडियाने वनडे मालिकेतही २-१ अशी मालिका जिंकली आहे.