ऋषभ पंत ऑस्ट्रेलियात पोहोचला, त्याच्या मागे मागे उर्वशी रौतेला ही ऑस्ट्रेलियात

11

मुंबई, १० ऑक्टोबर २०२२ : बॉलीवूड आणि क्रिकेट यांचं जवळचं नातं आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्र्यांनी भारतीय क्रिकेटपटूंशी लग्न केले आहे, सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत आणि उर्वशी रोतेलाची खूप चर्चा चालू आहे. उर्वशी ने सोशल मीडियावर काही लिहिले किंवा शेअर केले तर ती लगेच ट्रोलच्या निशाण्यावर येते, तसेच काही आज घडलं आहे आज उर्वशीने तिच्या सोशल मीडियाअकाउंट वर शेअर केलेल्या पोस्ट ने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

उर्वशी रोतेलाने स्वतःचा एक फोटो शेअर करत ती ऑस्ट्रेलियाला जात असल्याचा सांगितले आहे. त्यात तिने मी माझ्या प्रेमाला फॉलो करीत असल्याचा कॅप्शन दिलं आहे, त्यामुळे दोघांच्या चहात्यांनी आतापासूनच ट्रोलिंग करायला सुरुवात केली आहे. उर्वशी येथेच न थांबता पुढच्याच काही पोस्टमध्ये तिने दुःखी शायरी शेअर करून आपले दुःख चाहत्यांसमोर मांडले आहे.

ऋषभ पंत सध्या भारतीय टीम सोबत आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. अशातच उर्वशी देखील आता त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियात दाखल झाल्याने खूप चर्चा रंगल्या आहेत, काही दिवसांपूर्वी पंतचा वाढदिवस झाला त्यावेळी सुद्धा पंत च नाव न घेता उर्वशीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. त्या वेळी ही ती खूप चर्चेत आली होती.

दरम्यान २०१८ मध्ये ऋषभ आणि उर्वशी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर उर्वशी रौतेला आणि ऋषभ पत यांच्यातील वाद पाहायला मिळाला होता, उर्वशीच्या मुलाखतीवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला होता, त्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो सुद्धा केलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव