एजबॅस्टन टेस्ट मध्ये ऋषभ पंतचे शानदार शतक, 111 चेंडूंच्या खेळीत 20 चौकार, चार षटकार

एजबॅस्टन, 2 जुलै 2022: ऋषभ पंतचा धमाका इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टनवर पाहायला मिळाला. इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत पंतने शानदार शतक झळकावले. पंतने शतक झळकावण्यासाठी केवळ 89 चेंडू घेतले आणि 15 चौकार आणि एक षटकार लगावला. ऋषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे शतक ठरले.

146 धावांची शानदार खेळी खेळून अखेर ऋषभ पंत बाद झाला. पंतला जॅक क्रोलीच्या हाती जो रूटने झेलबाद केले. पंतने 111 चेंडूंच्या खेळीत 20 चौकार आणि चार षटकार मारले.

जडेजासोबत चांगली भागीदारी केली

ऋषभ पंतची ही खेळी भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची होती कारण एका क्षणी भारतीय संघाने 98 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या आणि 150 धावा करणे देखील कठीण होते. अशा स्थितीत पंत आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी 222 धावांची शानदार भागीदारी करत भारतीय डावाचा ताबा घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 338 धावा केल्या होत्या. जडेजा 83 तर मोहम्मद शमी शून्य धावा करत खेळत आहे.

ऋषभ पंतचे हे 2022 मधील दुसरे शतक आहे. तत्पूर्वी, पंतने जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीतही शानदार शतक झळकावले होते. एका कॅलेंडर वर्षात दोन शतके झळकावणारा पंत आता चौथा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. याशिवाय पंत आशियाबाहेर चार शतके झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षकही ठरला आहे. विजय मांजरेकर, ऋद्धिमान साहा आणि अजय रात्रा यांची आशियाबाहेर प्रत्येकी तीन शतके आहेत.

एका कॅलेंडर वर्षात दोन कसोटी शतके (भारतीय WK)

1964 ब. कुंद्रन
2009 एमएस धोनी
2017 रिद्धिमान साहा
2022 ऋषभ पंत

टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

ऋषभ पंतने शतक झळकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतला 5 डावात केवळ 58 धावा करता आल्या. त्याचवेळी आयपीएलमध्येही त्याची बॅट तेवढी खेळली नाही.दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने आयपीएल 2022 मध्ये 14 सामने खेळून 30.90 च्या सरासरीने 340 धावा केल्या. यादरम्यान ऋषभ पंतची सर्वोत्तम धावसंख्या ४४ धावा होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा