वाढत्या इंधन दरवाढी वरुन राज्य आणि केंद्र सरकार मध्ये जुंपली,त्रास मात्र सर्व सामान्यांना सहन करावा लागतोय

मुंबई, ३१ ऑक्टोंबर २०२१ : सध्या भारतात पेट्रोल डिझेल चे भाव हे गगनाच्या हि वर गेले आहेत.पेट्रोल डिझेल च्या वाढत्या दरवाढीमुळे सर्व सामान्यांच्या खिशाला आणि आर्थिक बजेट ला मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे.महागाई मुळे सर्व सामान्य जनता सध्या सर्वात जास्त त्रस्त झाली असून यावर काय करावे हे कळेनासे झाले आहे.
भाजपवर साधला निशाणा…..
युवक काँग्रेसचे प्रमुख श्रीनिवास बी व्ही यांनी पेट्रोल दरवाढीमुळे सरकारवर निशाणा साधला आहे.तसेच १५० रुपये पेट्रोलचे दर वाढीची बातमी,असा अंदाज व्यक्त करणारी बातमी शेयर केली आहे.यावरुन एव्हढे ठिक आहे का? आणखी आच्छे दिन हवेत का? असा सवाल करत मोदी सरकार वर श्रीनिवास यांनी सडकून टीका केली आहे.
तर सध्या अनेक शहरांमध्ये पेट्रोल चे दर हे ११४ ते ११५ च्या वर गेले आहेत.ज्या मुळे अनेकांना आपल्या गाडीत पेट्रोल टाकण्या आधी खिशाला किती कात्री लागणार याकडेही लक्ष द्यावे लागत आहे.तर या वाढत्या पेट्रोल डिझेल इंधन च्या दरवाढी वर अनेक नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.तसेच या वाढत्या दरवाढी वरुन राज्य आणि केंद्र सरकार मध्ये जुंपली असली तरी त्रास मात्र सर्व सामान्यांना सहन करावा लागतोय हे खरं…..
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा