पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, तर दुसरीकडे दारू स्वस्त

10

मुंबई, २४ फेब्रुवरी २०२१: एकीकडे सरकार रोज पेट्रोल डिझलचे भाव वाढवत आहे.ज्यामुळे सामन्य जनता या दरवाढीमुळे चांगलीच संतापल्याचे पहायला मिळत आहे. असे असले तरी तळीरामांसाठी लवकरच एक खुशखबर येणार आहे.सरकार याबाबतीत एक असा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे.ज्यामुळे तळीरामांना आणि मद्दप्रेमींना आनंदाचे दिवस येतील.

केंद्र सरकार बर्याच ब्रँडवरील किंमती कमी करण्याच्या विचारात आहे.त्यानुसार,युरोप मधून आयात केलेल्या दारूवरील सीमाशुल्क निम्मे होऊ शकते.सध्या असे दिसत आहे.की सीमशुल्क हि ७५% पर्यंत आसेल तर;विदेशी अल्कोहोल उत्पादनावर १५०% असेल.यामुळे भारतातील बहुतेक परदेशी ब्रँड सध्याच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत मिळतील.यामुळे दारु स्वस्त दरात मिळेल.

एकंदरीत तळीरामांसाठी हि आनंदाची बातमी असली तरी दुसरीकडे मात्र या विषयावरून जनतेचं दुमत पहायला मिळत आहे.ज्यामधे सरकारला इंधन दरवाढीमुळे निशाण्यावर धरले जात आहे.महाराष्ट्रात ही पेट्रोलचे भाव ९६ रू लिटर झाले आहे.त्यात सर दारू स्वस्त करण्यापेक्षा जरा या इंधन दरवाढीकडे लक्ष्य देण्याचे कार्य करावे आशी प्रतिक्रिया उमटत आहेत.

दारू स्वस्त झाली तर मग अनेक घरात भांडणं सुरू होतील.सरकाराला स्वताची तिजोरी भरून घेण्याशी काम आहे.त्यांना सामन्य जनतेचं काहीच पडलेलं नाही.जिथे जीवनावश्यक गॅस २५ रूपयांनी वाढवला ते कमी करायचे सोडून हे सरकार दारू स्वस्त करण्याच्या विचारात आहे.अशी टिका सोशल मिडियातून होताना दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव