रितेश – जेनेलियाचा मक्याच्या शेतातील टिक टॉक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा मक्याच्या शेतातील टिक टॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तुझे मेरी कसम या चित्रपटाला नुकतीच १७ वर्ष पूर्ण झाली. चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी याच चित्रपटातील टायटल सॉंगचे चित्रीकरण हे रितेश देशमुख यांच्या मुळगावी म्हणजे बाभळगाव इथं करण्यात आले आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या चित्रपटाने अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ह्या जोडीनं मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चुणूक तर दाखवून दिली. ऑफ स्क्रीनही त्यांना पाहिल्यावर जोडी ‘रब ने बना दी’ जोडी असंच वाटतं. ह्या दोघांची लव्हस्टोरी ज्या चित्रपटाच्या सेटवर खुलली त्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला ३ जानेवारीला १७ वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे दोघांनी मिळून खास व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी ट्वीटरवरून पोस्ट केले.
तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची भेट झाली आणि नंतर ते विवाहबंधनात अडकले. रितेशचा हा पहिलाच पदार्पणाचा चित्रपट होता. या चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झाले असून याचं शिर्षक गीताचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा