दुबई, १९ सप्टेंबर २०२०: आयपीएलच्या उद्घाटन सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे .गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लागण झालेला खेळाडू ऋतुराज गायकवाड याची कोरोना चाचणी ही निगेटिव आली आहे.
स्पोर्ट्स स्टारने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांच्या आत ऋतुराज गायकवाड याची पुन्हा एकदा चाचणी घेतली जाईल. त्यानंतर जर त्याची चाचणी ही निगेटिव आली तर ऋतुराज आपल्या संघासोबत राहील. आणि दोन सामन्यानंतर त्याला प्लेइंग ११ मध्ये सहभागी होता येईल. ऋतुराज गायकवाड हा एकमात्र खेळाडू आहे ज्याने आतापर्यंत चेन्नई संघासोबत सराव नाही केला आहे.
सांगण्यात येत आहे की, सुरेश रैना याने आयपीएल मधून माघार घेतल्या नंतर त्याच्या स्थानी तिसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड याला संधी देण्यात येऊ शकते. जर ऋतुराज याची दुसरी चाचणी ही निगेटिव आली तर त्याला प्लेइंग ११ मध्ये रैनाच्या जागी खेळवण्यात येऊ शकते.
बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार त्याला फिटनेस चाचणी ही पास करावी लागणार आहे. यात त्याला कमीत कमी २-३ दिवसांचा अवधी लागणार आहे. महाराष्ट्र संघासाठी क्रिकेट खेळणारा फलंदाज ऋतुराज याने इंडिया ‘ अ ‘ साठी सुद्धा उत्तम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे