सुशांतच्या बहिणीच्या विरोधात रियानं दाखल केली एफ आय आर

मुंबई, ८ सप्टेंबर २०२०: सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात रिया ने सुशांत सिंगच्या बहिणीच्या विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. सुशांतच्या बहिणीने दिलेल्या प्रिस्क्रिप्शन मधील गोळ्या सुशांतने घेतल्या होत्या. यानंतर केवळ पाच दिवसातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या विषयी ही त्याच्या बहिणीची देखील चौकशी केली जावी अशी मागणी तिने केली आहे.

सुशांतची बहीण प्रियंका सिंग आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी हा गुन्हा सीबीआयकडे वर्ग केला आहे. काल नार्कोटिक्स विमानाच्या कार्यालयातून रिया जेव्हा बाहेर पडली तेव्हा तिने थेट वांद्रे पोलीस स्टेशन गाठलं होतं त्यावेळी तिने ही तक्रार नोंदवली.

मिळालेल्या माहितीनुसार नीतू सिंग, प्रियंका सिंग आणि डॉक्टर तरुण कुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. हा गुन्हा यासाठी नोंदविण्यात आला आहे की, एंझायटी डीसऑर्डर या आजाराशी संबंधित डॉक्टर तरुण कुमार यांच्या डिस्क्रिप्शन वरून सुशांत ने ८ जूनला मेडिकलमधून औषध मागवली होती. रियाच्या म्हणण्यानुसार ही औषधे कोणत्याही तज्ञ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय दिली जात नाहीत. संबंधित रुग्णाची त्या डॉक्टरांना संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. मात्र असे असताना देखील तरूण कुमार यांच्या प्रिस्क्रिप्शन वरून सुशांतला या गोळ्या देण्यात आल्या.

काय आहे एफ आय आर मध्ये

महत्त्वाचं म्हणजे तरुण कुमार यांच्या प्रेस्क्रीप्शन वरती सुशांतला ओपीडी पेशंट म्हणून दाखवण्यात आले आहे. तर आठ जून रोजी सुशांत मुंबईमध्येच होता. मग हे कसं शक्य झाले असा प्रश्न रिया ने विचारला आहे. ८ जून पासून ते त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत सुशांतची बहीण मितू सिंग त्याच्या सोबत राहत होती. प्रियंका सिंगने सुशांतला ज्या गोळ्यांची नावे पाठवली होती त्यानुसार मीतुने सुशांत ला या गोळ्या दिल्या. यामुळेच सुशांतचा एंझायटी डीसऑर्डर वाढला असावा असा आरोप रियाने केला आहे.

विशेष म्हणजे रियाच्या म्हणण्यानुसार १३ जून रोजी तिला मिळालेल्या माहितीनुसार सुशांतने म्यारीजियना घेतले होते. डिसक्रिप्शन मधील औषधे आणि म्यारीजियना या दोन्हींच्या एकत्र सेवनामुळे त्याला भयंकर त्रास झाला असावा आणि त्याचा शेवटचा पर्याय म्हणून त्यानं आत्महत्या केली असावी असं तिने आपल्या एफआयआरमध्ये नमूद केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा