आज रियाला होणार अटक..?

मुंबई, ६ सप्टेंबर २०२०: सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात शुक्रवार आणि शनिवार एनसीबीसाठी महत्त्वाचे ठरले आहेत आणि आता रविवारीही दोन मोठ्या गोष्टी होणार आहेत. शनिवारी कोर्टाने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना ४ दिवसांच्या एनसीबी कोठडीचा निर्णय दिला. आता रविवारी रियाला एनसीबीसमोर हजर करण्यास सांगितले गेले आहे. रिया चक्रवर्ती रविवारी एनसीबीसमोर हजर होतील. एनसीबीचे अधिकारी मुथा अशोक जैन म्हणाले की, रिया आणि शौविकचा सामना दीपेश सावंतशी होईल.

असे सांगितले जात आहे की रियाची ड्रग्ज प्रकरणात कडक चौकशी केले जाणार आहे. एनसीबी रियाची मिरांडा, शौविक आणि इतरांशी व्हॉट्सअॅप चॅटविषयी व ड्रग्जविषयी चौकशी करेल. यासह रिया चक्रवर्ती हिची ही या प्रकरणात अटक होऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. रियाचा भाऊ शौविक याला अटक करून रिमांड घेतल्यानंतर, रविवारी रियालाही अटक केली जाऊ शकते अशी अटकळ लावली जात आहे.

शौविक आणि मिरांडाशिवाय सुशांतचा कर्मचारी दीपेश सावंत याला ही शनिवारी अटक करण्यात आली. रविवारी सकाळी १० ते १०.३० या दरम्यान दीपेश सावंत याला मुंबईतील हॉलिडे कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. सावंतने कबूल केले की त्याने रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्या सांगण्यावरून बंदी घातलेले मादक पदार्थ खरेदी केले होते. सावंत याला चांगलीच माहिती होती की त्याने खरेदी केलेली मादक पदार्थ आणि वाहतूक बेकायदेशीर आहे. या प्रकरणात एनसीबी सावंत यांना पाच दिवस कोठडीत ठेवण्याची मागणी करू शकते.

एनसीबीने शुक्रवार आणि शनिवारी बरीच मोठी पावले उचलली आणि ड्रग्जच्या बाबतीत रिया चक्रवर्ती हिच्यासह काही ड्रग्स पेडलर्सच्या घरावर छापा टाकला. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) रियाचा भाऊ शौविक यांच्यासह ७ जणांना अटक केली. यात सॅम्युएल, करण, कैझान, दीपेश आणि जैद यांची नावे आहेत. दीपेश याचे निवेदन एनडीपीएस कायद्याच्या कलम ६७ नुसार नोंदवले गेले होते आणि त्याला एनडीपीएस कायद्यांतर्गतच अटक करण्यात आली आहे. आता रविवारी हे प्रकरणात काय वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा