बारामती, १४ फेब्रुवरी २०२१: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती यांच्या वतीने मु. सा. काकडे महाविद्यालयात सोमेश्वर नगर येथे सडक सुरक्षा जीवन रक्षक अंतर्गत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम काटेकोरणपणे पाळणे आवश्यक आहे.पोर, थोर व ढोर यांचा आदर करून सय्यमपणे वाहन चालविले तर अपघात टाळता येतात. देशात अपघातात मृत्यु पडणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, हेल्मेट न वापरणे, जखमींना मदत न करणे यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. असे वक्तव्य उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी प्रकाश खटावकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्तावित उपप्राचार्य रवींद्र जगताप यांनी केले तर प्राचार्य जवाहर चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उपप्रादेशिक कार्यालयातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे सह-सचिव सतीश लकडे,उपप्राचार्य डॉ.जया कदम, पर्यवेक्षिका जयश्री सणस उपस्थित होते. तर डॉ दत्तात्रय डुबल यांनी आभार मानले.
न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव