गोल पोस्ट महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न

अंबाजोगाई, बीड, १९ जानेवारी २०२४ : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी अधीक्षक चेतना तिडके म्हणाल्या की, ‘रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहन चालकांची हलगर्जी मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहे. कुटुंबातील कर्त्याचा मृत्यू हा त्या कुटुंबासाठी कर्दनकाळ ठरत असल्यामुळे पूर्ण कुटुंबाची वाताहात होते. असे मृत्यु टाळण्यासाठी सुरक्षा साधनाचा वापर करावा आणि वाहन काळजीपूर्वक चालवावे.’

न्यूज अनकट प्रतिनिधी : अरुण गित्ते

error: Content is protected !!
Exit mobile version