दिल्लीत रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, पावसाच्या पाण्यातून काढावा लागतोय दिल्लीवासीयांना मार्ग

नवी दिल्ली, १६, जुलै २०२३ : मागील आठ ते दहा दिवसापासून दिल्लीमध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. यमुना नदीने धोक्याची पाणीपातळी ओलांडल्यामुळे पावसाचे पाणी हे लाल किल्ला, राजपथसह सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहे. तर संपूर्ण दिल्लीच पाण्याने भरल्याचे सध्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाने माजवलेल्या धुमाकळीमुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असून, जनजीवनावरही याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

राजधानी दिल्लीत पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मागच्या ४० वर्षांचा रैकॉर्ड मोडत पावसाने धुव्वाधार बॅटिंग केली.सध्याची परिस्थिती पाहता उत्तर भारतातील अनेक राज्यात पाऊस धो-धो बरसतो आहे. त्यामुळे येत्या काळात यमुना नदीची पाणी पातळी अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.मंगळवारपर्यंत यमुना नदीची पाणी पातळी २०५.३३ मीटरपर्यंत वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा, गाजियाबाद या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीत रस्त्यावरील पाण्यामुळे काही ठिकाणी गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत,तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.पुढचे पाच दिवस दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दिल्लीतील नागरिकांनी स्वत: ची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा