अमेरिकन दूतावासाजवळ रॉकेट हल्ला

बगदाद : इराकची राजधानी बगदादमध्ये रविवारी (दि.२६) रोजी रात्री अमेरिकन दूतावासाजवळ पाच रॉकेट सोडण्यात आले आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. एका महिण्यात अमेरिकन दूतावासाजवळ करण्यात आलेला हा चौथा हल्ला आहे.

‘एएफपी’ने या वृत्तसंस्थेने सुरक्षा यंत्रणेच्या माहितीनुसार हे वृत्त समजले आहे. इराणमध्ये तणाव वाढल्यानंतर बगदादमधील अमेरिकन दूतावासाजवळ हल्ल्याची मालिका सुरू झाली आहे. सुलेमानी त्याच्या फौजेसह बगदाद एअरपोर्टकडे कूच करत होता तेव्हा अमेरिकेने हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू महदी अल मुहांदिस हा देखील ठार झाल्याचे सांगण्यात आले होते.

कासिम सुलेमानी पश्चिम आशियात इराणी कारवायांमागचा सूत्रधार मानला जात होता. त्यानेच सिरियामध्ये आपले जाळे पसरवले होते. तसेच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करण्याचाही आरोप त्याच्यावर होता. अमेरिका मागील काही दिवसांपासून त्याच्या मागावर होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा