रॉजर फेडरर ठरला जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

यू एस, दि. ३० मे २०२०: दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीमध्ये स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अव्वल स्थानावरून तिसर्‍या स्थानावर घसरला आहे.

२० ग्रँड स्लॅम एकेरी विक्रमी मालिका असलेल्या स्विस स्टार फेडररने १२ महिन्यांत १०६.३ दशलक्ष (सुमारे ८०२ कोटी रुपये) कमावले, जे त्याने १०० दशलक्ष डॉलर्सच्या कराराद्वारे साध्य केले आहे.

यासह, ३८ वर्षीय फेडररने फोर्ब्सच्या यादीत चार स्थानांची झेप घेतली आहे. टेनिसविषयी बोलायचे झाले तर, तो सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत अव्वल क्रमांकावर असलेला पहिला खेळाडू ठरला.

क्रिस्टियानो रोनाल्डो (१०५$ दशलक्ष डॉलर्स), मेस्सी (१०४ दशलक्ष डॉलर्स), नेमार (९५.५ दशलक्ष) आणि अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू लेब्रोन जेम्स (८८.२ दशलक्ष) हे पहिल्या पाचमध्ये आहेत.

शीर्ष १० ची यादी –

१. रॉजर फेडरर (टेनिस): $ १०६.३ दशलक्ष

२. क्रिस्टियानो रोनाल्डो (फुटबॉल): $ १०५ दशलक्ष

३. लिओनेल मेस्सी (फुटबॉल): $ १०४ दशलक्ष

४. नेमार (फुटबॉल): $ ९५.५ दशलक्ष

५. लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल):$ ८८.२ दशलक्ष

६. स्टीफन करी (बास्केटबॉल): $ ७४.४ दशलक्ष

७. केविन ड्युरंट (बास्केटबॉल): $ ६३.९ दशलक्ष

८. टायगर वुड्स (गोल्फ): $ ६२.३ दशलक्ष

९. कर्क कझिन (फुटबॉल): $ ६०.५ दशलक्ष

१०. कार्सन वेंट्झ (फुटबॉल): $ ५९.१ दशलक्ष

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा