रोहितचे सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक षटकार

38

राजकोट: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करताना सहा षटकारांची बरसात केली. क्रिकेट विश्वात एका वर्षात सलग तिसऱ्या वर्षी ही सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. या वर्षी त्याने एका वर्षात कसोटी एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट मिळून ६६ षटकार लगावले. यापूर्वी त्याने २०१७ मध्ये ६५ आणि २०१८ मध्ये ७५ षटकार लावले होते. बांगलादेश विरुद्ध त्याने सर्वाधिक १९ षटकार लावताना वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युअल्स ला मागे टाकले. त्याने दहाव्यांदा ७५ हून अधिक धावा केल्या अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातील एकमेव फलंदाज आहे.