पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित पुन्हा फ्लॉप, चाहते म्हणाले तू आता..

8

७ फेब्रुवारी २०२५ नागपूर : भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिकेचा पहिला सामना नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसीएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात आला. यात टीम इंडियाने इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला. यादरम्यान टीम इंडियाचा अनुभवी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा त्याच्या खराब फॉर्ममुळे चाहत्यांच्या निशाणावर आला आहे. विशेष म्हणजे रोहित बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. याआधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सोबतच्या कसोटी मालिकेत सुद्धा त्याची कामगिरी खराब राहिली. त्यानंतर बीसीसीआयाने केलेल्या नियमावालीनुसार देशांतर्गत रणजी ट्रॉफीत सुद्धा त्याला आपला फॉर्म सुधारता आला नाही आणि काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सुद्धा अवघ्या ७ चेंडूत २ धावा करून तो पव्हेलियनमध्ये परतला. यानंतर चाहते निराश होऊन त्याला सोशल मिडियावर ट्रॉल करत आहे.

मागच्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा खूप दबावात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळल्या गेलेल्या ५ डावांमध्ये त्याने केवळ ३१ धावा केल्या होत्या. याच परिस्थित त्याने सिडनी कसोटीतून मागर घेतली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीत १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी सुद्धा चाहत्यांनी सोशल मिडियाआवर ट्रॉल केलं होत. पहिल्या वनडे सामन्यात रोहितला साकिब महमुदने अवघ्या २ धावांवर झेल बाद केले. त्यानंतर तो परत चाहत्यांच्या निशाणावर आला आहे. रोहित शर्माने आता निवृत्त व्हावे, असे चाहते मोट्या संखेने म्हणत आहेत.

“रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर निवृत्ती घ्यावी आणि तो फिटनेसकडे लक्ष देत नाही,” असे एका चाहत्याने लिहिले आहे. पुढे एका चाहत्याने लिहिले की, ‘रोहित शर्माची शैली चांगली आहे की तो लवकर आउट होतो.’ रोहितला बाहेर फेकण्यापूर्वी त्याने निवृत्ती घ्यावी. रोहित आता भारतीय संघासाठी ओझे बनत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा