गोल पोस्ट महाराष्ट्र कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयास रोहित पवारांची भेट

कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयास रोहित पवारांची भेट

कर्जत,दि. ९ मे २०२०: कर्जत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड केअर सेंटर म्हणून
समर्पित केलेल्या उपजिल्हा रुग्णालयास कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.

त्या वेळी कर्जतचे तहसीलदार सी. एम. वाघ, आरोग्य अधिकारी संदिप पुंड, डाॅ. बांगर उपस्थित होते. पवार यांनी आरोग्य सुविधेचा आढावा घेतला आणि कोणतीही अडचण भासल्यास संपर्क साधावा अशाही सुचना दिल्या. उपजिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचा-यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार रोहित पवार यांनी मास्क वाटप केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version