महिला आरक्षण विधेयकावर रोहित पवार यांचे सूचक विधान

मुंबई, २० सप्टेंबर २०२३ : विषेश अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काल मोठ्या दिमाखात नव्या संसद भवनात प्रवेश करण्यात आला. यानंतर नव्या संसद भवन इमारतीत महिला आरक्षण विधेयकाने संसदेच्या कामकाजाचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यानंतर या विधेयकावरून राजकीय वर्तुळासह सर्वत्र चर्चा सुरू आहे. या विधेयकाविषयी प्रतिक्रिया देताना, केंद्राच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ‘x’वर सूचक पोस्ट केली आहे.

रोहित पवार यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारप्रमाणे ‘बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायच’ अशा प्रकारे केंद्र सरकारचीही भावना असू शकते किंवा लोकसभेच्या निवडणुका २०२६ पर्यंत पुढे ढकलून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ च्या नावाखाली विधानसभा व लोकसभा एकत्र घेण्याचा विचार सरकारचा असू शकतो, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावूनही महिला आरक्षण आता नाही तर २०२६ पर्यंत लागू होणार असेल तर याचे हे दोनच अर्थ निघतात. असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा