रोहित शर्माचे निवृत्तीबद्दल मोठे वक्तव्य ; म्हणाला मी आज..,

30
Rohit Sharma's big statement about retirement
विजयानंतर रोहित शर्माने निवृत्तीवर मोठे वक्तव्य केले आहे.

Rohit Sharma Retiring From ODIs : चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकून करोडो लोकांचे मने जिंकली पण काल झालेल्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. तशा अफवा सुद्धा पसरल्या होत्या. रोहितच वय पाहता तो २०२७ चा वर्ल्डकप खेळणार नाही, असे म्हटले गेले. पण यातच सर्व चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट्स समोर येत आहे. ती म्हणजे रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुष्काळही संपवला आणि सामन्यानंतर या सर्व अफवांवर पत्रकार परिषद घेऊन भाष्य सुद्धा केले. यामध्ये त्याने आपल्या पुढच्या भविष्याबद्दल मोठे भाष्य केले आहे.

कालच्या सामन्यात २५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात सुद्धा चांगली राहिली नव्हती. शूबनम गिल अवघ्या ३१ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाचा तुरा सांभाळला. त्याने ७६ धावांची शानदार खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने ४८ धावांचे योगदान दिले, तर के एल राहुल नाबाद ३४ धावा आणि हार्दिक पांड्या १८ यांच्या दोघांच्या ३८ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. रवींद्र जाडेजाने विजयी चौकार खेचला आणि भारतीय संघाने ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

निवृत्तीबद्दल रोहित काय म्हणाला

वनडे क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांवर रोहित म्हणाला की, भविष्याचा काही प्लॅन नाही केलाय, जे सुरूय ते तसंच सुरू राहणार आहे. मी वनडे क्रिकेटमधून कोठेही जात नाही. “एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो, मी आज काही निवृत्त होत नाहीये. कोणत्याही अफवा पसरू नका, म्हणून आधीच स्पष्ट करून टाकतो. मी कुठेच जात नाहीये.” २०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत मी खूप धावा केल्या, परंतु संघ विजय मिळवू न शकल्याने, मजा नाही आली. संघ जिंकतो आणि जेव्हा त्यात तुमचा हातभार असतो, त्याने खूप समाधान मिळते.

प्रथमेश पाटणकर, न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा