कर्जत, दि. ३० जुलै २०२०: कर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे कोरोना केअर सेंटर मध्ये रुग्णांची काळजी घेताना डॉक्टर व इतर कर्मचारी वर्गासाठी PPE किट तसेच N95 मास्क आवश्यक आहे. ही वाढती गरज लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने शंभर PPE किट्स व शंभर N95 मास्क असे सुमारे एक लाख रुपये किंमतीचे साहित्य प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे मॅडम, तहसीलदार नानासाहेब आगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी हे किट्स रोटरी कडून स्विकारले.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे, सचिव घनश्याम नाळे, रोटरीचे फाउंडर चेअर डॉक्टर संदीप काळदाते, नितिन देशमुख, खजिनदार राजेंद्र जगताप, नितीन तोरडमल, चंद्रकांत राऊत,ओंकार तोटे, संदीप गदादे, अक्षय राऊत, श्रीराम गायकवाड, रवींद्र राऊत, सचिन धांडे, सचिन गोरे, अविनाश पुराणे उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने मागील चार वर्षापासून समाजोपयोगी कामे केली जात आहेत. येथून पुढेही समाजातील विविध विषयांवर काम करण्यासाठी व आवश्यक मदतकार्यात रोटरी क्लब नेहमी तयार असेल असे आश्वासन रोटरीचे अध्यक्ष प्रा.विशाल मेहेत्रे यांनी दिले. कोरोनाला लोकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी. प्रशासनाचे नियम पाळावेत असे आवाहन डॉक्टर संदीप काळदाते यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटकाळात रोटरी क्लब या सामाजिक संघटनेने प्रशासनाला व समाजाला केलेली मदत ही अनमोल आहे असे मत प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी व्यक्त केले. रोटरीच्या मदतीबद्दल तहसीलदार नानासाहेब आगळे, आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष