रोटरी (सोलापूर), दि. १० जुलै २०२०: रोटरी क्लब, टेंभुर्णी चा पद्ग्रहण समारंभ करोना च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रीतीने न होता, क्लब मध्येच निवडक सभासदाच्या उपस्थित मध्ये छोटेखानी पद्धतीने पार पडला या वेळेस मावळते अध्यक्ष मुकुंद अटकळे, सचिव सचिन होदाडे यांचे कडून नूतन अध्यक्ष शब्बीर जहागीरदार सचिव उमेश रावळ यांनी घेतला.
पदभार घेतला रोटरी क्लब टेंभुर्णी चा पद्ग्रहण समारंभ हा मोठया दिमाखात पार पडत असतो. परंतु, या वेळी एकंदर करोना साथीची परिस्थिती पाहता क्लब ने साधेपणा ने पद्ग्रहण सोहळा घेतला. यावेळी क्लब ला पुढील वर्षी साठी करवायच्या कामा संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी रोटरी जिल्हा ३१३२ चे माजी प्रांतपाल रो.विष्णू मोंढे व सन २०-२१ चे रोटरी जिल्हा २१३२ उपप्रांतपाल रो.सुभाष पाटील(माढा) हे आवर्जुन उपस्थित होते. या रो.विष्णू मोंढे यांनी मार्गदर्शन करताना क्लब च्या आजवरच्या कामाचे कौतुक केले. तसेच क्लब ने आता आपल्या पारंपरिक समाजकार्या बरोबरच आता मोठे आरोग्य विषयक काम करावे त्याची टेंभुर्णी व परिसराला अधिक गरज आहे. अशी अपेशा व्यक्त केली.
तसेच या साठी रोटरी इंटरनॅशनल च्या ग्लोबल ग्रॅड मधून ही मदत करता येईल त्या साठी टेंभुर्णी क्लब ला सर्वोत्तपरी सहकार्य करणार असलेल्याचे सांगितले. तसेच मानवी जीवन हे असंख्य अडचणीतुन जात असते तरी पण त्यातूनच थोड्या का असेना सुखाचा आनंद घ्यावा असे त्यांनी उदाहरणा सह पटवून दिले. या रो.सुभाष पाटील यांनी ही प्रथे प्रमाणे प्रांतपाल रो.हरीश मोटवणी यांचा शुभेच्छा संदेश रोटरी क्लब, टेंभुर्णी ला दिला व रोटरी क्लब टेंभुर्णी ला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच करोना लॉकडाऊन मध्ये मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रो.संदीप जाधव रो.नागेश कल्याणी यांनी पुढाकार घेत ‘रक्तपेढी आपल्या दरी’हा उपक्रम राबविण्यात आला त्या बद्द्ल रोटरी जिल्हा ३१३२ तर्फे त्यांना कोविड वरियर हे प्रमाणपत्र रो.विष्णु मोंढे यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.
मावळते अध्यक्ष रो.मुकुंद अटकळे यांनी गत वर्षी च्या कार्याचा चा आढावा सांगितला. नूतन अध्यक्ष शब्बीर जहागीरदार यांनी या वर्षा साठी च्या आपल्या संकल्पना सांगितल्या नूतन सचिव उमेश रावळ यांनी सर्वांचे आभार मानले या वेळी रोटरी क्लब, टेंभुर्णी चे रमेश पाटील, नागेश बोबडे, यशवंत हांडे, विनोद शिंदे आदि माजी अध्यक्ष व बहुतांश रोटरी सदस्य उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील