रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण

मंचर : जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आयोजित रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उद्योगरत्न पुरस्कार वितरण समारंभ ८ जानेवारी २०२० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी लोकसभेचे माजी अध्यक्ष व जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मा.मनोहर जोशी तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शुभहस्ते जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक श्रीकांत बडवे, जी.एस.काळे, अशोक वर्तक, सुबोध भावे, शीला धारिया यांना उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी व महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा