मुंबई, १९ मे २०२३: कंगना राणावत तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड इंडस्ट्रीज एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आत्तापर्यंत तिने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. गुरुवारी, कंगनाने इंस्टाग्राम स्टोरी टाकत पोस्ट-प्रॉडक्शन स्टेजमध्ये प्रवेश केलेल्या आणीबाणीबद्दल ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाबद्दल एक अपडेट शेअर केला.
विजयेंद्र प्रसाद या लेखकासह स्वत:चा एक फोटो शेअर करत कंगनाने लिहिले होते की, “संपूर्ण एडिट झाल्यानंतर, ‘इमर्जन्सी’ पाहणारी पहिली व्यक्ती. एडिट पाहताना विजेंद्र सरांनी अनेकवेळा डोळे पुसले एवढेच नाही तर ते पाहिल्यानंतर मला तुझा खूप अभिमान आहे असेही त्यांनी मला त्यानंतर आयुष्याचा सार्थक झाल्यासारखं वाटलं.”
‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या निमित्ताने कंगना दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकल्यावरचा तिचा हा पहिला चित्रपट इंदिरा गांधींचा जीवनपट उलगडणारा आहे. त्यांचा जीवन प्रवास आणि राजकारणातील त्यांचे बहुमूल्य योगदान याची माहिती प्रेक्षकांना या चित्रपटामधून मिळणार आहे. इंदिरा गांधींच्या मुख्य भूमिकेत स्वतः कंगना पाहायला मिळणार असल्याने तिचे प्रेक्षकही उत्सुक आहेत.
कंगना व्यतिरिक्त या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, विशाक नायर आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या अधिकृत प्रदर्शनाची तारीख अद्याप प्रलंबित आहे. तरी इमर्जन्सी चित्रपटा व्यतिरिक्त कंगना एका चित्रपटात भारतीय वायुसेनेच्या पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या अधिकृत प्रदर्शनाची तारीख देखील अद्याप प्रलंबित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे