दुधदरवाढी साठी रासपचे जामखेड मध्ये अंदोलन

कर्जत, जामखेड दि. ७ जुलै २०२०: राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जामखेड येथे सोमवारी तहसीलदार कार्यालय समोर दुध दर वाढीच्या संदर्भात अंदोलन करण्यात आले.

वृत्त असे की सध्या परिस्थिती मध्ये दुधाचे भाव हे अगदी नगण्य आहेत. त्या मध्ये शेतकरी वर्गाचे पशुपालन करणे हे फार मोठे नुकसानीचे काम शेतकरी बांधवासाठी होऊन बसले आहे. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आंदोलनाचे हत्यार उपासण्यात आले आहे. जामखेड राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष विकास मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना विविध मागण्यांचे निवेदन देखील दिले.

दुधदरवाठीचे अंदोलन जामखेड तहसीलदार कार्यालय समोर पार पडले. या वेळी राष्ट्रीय समाज पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला दुध दरवाढी जामखेड तहसीलदार कार्यालय समोर चक्क विठ्ठलाच्या फोटोला दुग्धाभिषेक करून अंदोलन पार पाडण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा