RSS नेत्यांच्या जीवाला PFI कडून धोका; केंद्र सरकारने वाढवली सुरक्षा

नवी दिल्ली, १ ऑक्टोंबर २०२२ : केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS नेत्यांच्या जीवाला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) कडून धोका आहे, असे NIA च्या अहवालात उघड झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेनं(NIA) केंद्रीय गृहमंत्रालयाला ही माहिती दिली. या माहितीनंतर केंद्र सरकारनं केरळच्या 5 आरएसएस नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA आणि IB गुप्तचर विभाग रिपोर्टरच्या आधारे केरळमधील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या ५ नेत्यांना Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे या पाचही नेत्यांच्या संरक्षणासाठी आता पॅरामिलिट्री फोर्सचे कमांडो तैनात असतील.

येलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार, गृह मंत्रालयाच्या Y श्रेणीच्या सुरक्षेत एकूण 8 सुरक्षा कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ज्या व्हीआयपीला सुरक्षा दिली जाते, त्याच्या घरी ५ सशस्त्र स्टॅटिक गार्ड बसवले जातात. तसेच, तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षा देतात.

संघाचे नेते PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या रडारवर असल्याचा रिपोर्ट केंद्रीय तपास यंत्रनेने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला होता. २२ सप्टेंबर रोजी पीएफआयचा सदस्य मोहम्मद बशीरच्या घरी एनआयएने छापेमारी केली होती. यावेळी एनआयएला एक यादी सापडली होती. त्यात संघाच्या पाच नेत्यांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळेच या पाचही नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे

२२ आणि २७ सप्टेंबर रोजी एनआयए, ईडी, राज्य पोलीस आणि एटीएसने देशभरातील पीएफआयच्या ठिकाण्यांवर छापेमारी केली होती. यावेळी ३५० जणांची धरपकड करण्यात आली. यावेळी तपास यंत्रणाच्या हाती काही पुरावे लागले आहेत. त्यानंतरच केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या आठ संघटनांवर ५ वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा