आरटीई 2026-27 प्रवेश प्रक्रिया सुरू; 10 मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

पुणे – शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (RTE) 25% राखीव जागांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 ची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया आजपासून म्हणजेच मंगळवार दि.17 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 10 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी ही योजना लागू आहे. आर्थिक दुर्बल गटासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्ज करताना जन्मदिनांक, पत्ता, उत्पन्न व जात प्रमाणपत्र आदी माहिती अचूक भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत 25% आरक्षण लागू असून, पहिलीसाठी 1 किमी अंतरातील शाळेची अट कायम राहणार का? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : दिनेश वढणे