गोल पोस्ट शैक्षणीक “आरटीई” प्रवेश निश्चितीला आता आठ मेपर्यंत मुदतवाढ

“आरटीई” प्रवेश निश्चितीला आता आठ मेपर्यंत मुदतवाढ

नाशिक, २५ एप्रिल २०२३: आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे. पालकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली असून, अनेक विधार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या आठ मेपर्यंत विधार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणार येणार आहे. मुदतवाढ मिळाल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील आठ हजार ८२३ खासगी शाळांमधील एक लाख १ हजार ८४६ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लॉटरीत ९४ हजार ७०० विधार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १४ हजार ३३५ विधार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर अधापही ८७ हजार ५११ जागा रिक्त आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात सोमवारी सांयकाळपर्यत ७०० विधार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, चार हजार १५४ जागा शिल्लक आहेत.

आरटीई २५ टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही भीती अथवा संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांचे प्रवेशासाठी सोडत लॉटरी द्धारे निवड झाली आहे, अशा बालकांना शाळा प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version