आरटीओ अधिकाऱ्याची पगारापेक्षा ६५० पट जास्त मालमत्ता; तर सहा अलिशान महागडी घरं

जबलपुर, १८ ऑगस्ट २०२२: देशात अनेक ठिकाणी छापेमारी सुरु आहे. जालन्यानंतर आता एका अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकल्याची माहिती मिळाली आहे. जबलपुरचे आरटीओ अधिकारी संतोष पॉल याच्या घरी पगारापेक्षा ६५० पट अधिक मालमत्ता सापडली आहे.

या धाडीमुळे एकच खळबळ उडाली. ईओडब्ल्यूच्या पथकांनी एकाच वेळी पॉलच्या शताब्दीपूरम येथील अलिशान पेंटहाऊस आणि गार्हा फाटक यथील त्याच्या वडिल़ोपार्जित संपत्तीवर धाड टाकली आहे. हे धाडसत्र आणि कागदपत्रांची पडताळणी मध्यरात्रीपर्यंत सुरु होती.

आरटीओच्या विविध कामांमध्ये त्यांचे अनेक नातेवाईक कंत्राटी आणि भागीदारही आहेत. संतोष पॉल याच्या घरी तीनशे कोटीहून अधिक संपत्ती सापडली आहे. हे चार वर्षापासून जबलपुरमध्ये अधिकारी म्हणून तैनात आहेत. पॉल यांच्याकडे महालासारखी सहा अलिशान घरं आणि महागड्या गाड्या आहेत.

त्यांना गाड्या आणि फार्महाऊसची आवड असल्याचं ते सांगतात. मात्र एवढी संपत्ती आली कूठून याची चौकशी सुरु करण्यात आली आहे‌. पुढील तपास ईओडब्ल्यूचे अधिकारी करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा