गोल पोस्ट महाराष्ट्र अशोक चव्हाण कोरोनामुक्त व्हावेत म्हणून पैठणला रुद्र अभिषेक

अशोक चव्हाण कोरोनामुक्त व्हावेत म्हणून पैठणला रुद्र अभिषेक

औरंगाबाद , दि.२७ मे २०२०: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पैठणचे भूमिपुत्र अशोक चव्हाण कोरोनामुक्त व्हावे, म्हणून पैठण येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिरात पंचदिनी रूद्र एकादशनी अभिषेकास कॉंग्रेसचे प्रदेश सचिव तथा शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांनी प्रारंभ केला आहे.

मंत्री अशोक चव्हाण लवकर कोरोनामुक्त होऊन त्यांना दिर्घायुष्य लाभावे, अशी उपस्थित नागरिक व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी पैठणमध्ये धडकताच पैठणकरांना मोठी हुरहुर लागली. अशोक चव्हाण यांची कोरोनातून सुटका व्हावी, म्हणून विविध देवालयात नागरिकांनी प्रार्थना केली.

कॉंग्रेसचे प्रदेश सचिव रविंद्र काळे यांनी पैठण येथील ऐतिहासिक व प्राचीन सिद्धेश्वर घाटातील महादेव मंदिरात पंचदिनी रूद्र एकादशनी अभिषेकास प्रारंभ केला असून पाच दिवस हा अभिषेक सुरू राहणार असल्याचे रवींद्र काळे यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version