रूरल डॉक्टर प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

हवेली: डॉक्टर म्हटले की धावपळ क्षणा क्षणाला जीवन आणि मृत्यू चा लपंडाव…
रुग्णाचा जीव वाचला की समाधान आणि प्रयत्न करून ही यश नाही आले की येणारे नैराश्य…..
रोजचाच खेळ अश्या प्रकारे प्रत्येक डॉक्टरच्या आयुष्यात सुख दुःखाचा लपंडाव चालू असतो त्यातून काही क्षणांची विश्रांती घेण्यासाठी आणि बुद्धीला नव चैतन्य, उत्साह आणि चालना देण्यासाठी सूरु झालेला उपक्रम म्हणजे
आर डी पी एल

पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशन ने भरविलेली स्पर्धा ‘रूरल डॉक्टर प्रीमिअर क्रिकेट लीग’
धावपळीच्या जीवनात थोडीशी उसंत शोधण्याचा प्रयत्न, अश्या ह्या स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष. यात विविध डॉक्टर असोसिएशन च्या २० संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा १८ जानेवारी २० ते २४ जानेवारी २० पर्यंत स्पोर्टस डिझायर कार्पोरेशन ग्राउंडवर चालणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन डॉ. डि. एन. हंबीरे, डॉ. धूत, डॉ. देशमुख, डॉ. दरक, डॉ. सटाले ह्यां नामवंत डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर डी पी एल चे चेअरमन डॉ. ओमकुमार हलिंगे यांनी केले आणि अध्यक्षीय मनोगत डॉ. राहुल काळभोर यांनी व्यक्त केले, सुत्रसंचलन डॉ अनिल देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाला पूर्व हवेली चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन चौधरी, सचिव डॉ. रतन काळभोर, उपाध्यक्ष डॉ. नागेश गवते, खजिनदार, डॉ. नितीन मटकर
व लोणी काळभोर परीसरातील डॉक्टर उपस्थीत होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा