रशिया आणि बेलारूसला नोबेल पुरस्कार कार्यक्रमापासून राहावं लागणार वंचित…

17

रशिया, २६ ऑक्टोबर, २०२२ : रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु होऊन तब्बल ९ महिने झाले आहेत. तरीही हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर जगात मानाचे आणि महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराच्या कार्यक्रमात रशिया आणि बेलारूसला प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यांना १० डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे नोबेल समितीने जाहीर केलं.

या संदर्भात बोलताना नोबेल पुरस्कार समितीने सांगितले की, रशियाला या समितीपासून केवळ युद्धाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमापासून बाजूला ठेवण्यात आले. त्यांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांना या कार्यक्रमात आमंत्रित केले आहे. मात्र यंदा रशिया आणि बेलारुसच्या पक्षप्रमुखांना हे आमंत्रण देण्यात येणार नाही.
१९८६ रोजी नोबेल यांच्या निधनानंतर नोबेल प्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. पण यंदा मात्र रशियाला या सोहळ्याचा आनंद लुटता येणार नाही. हे दिसून येते.

त्यामुळे आता साहित्य क्षेत्रदेखील या युद्धाच्या खेळीत सहभागी झाले आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. पण त्यामुळे रशियाचे नुकसान होणार हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा