मॉस्को, २१ जुलै २०२२: रशिया आणि युक्रेन युद्ध हे सध्या सर्वांच्या तोंडचा विषय झाला आहे. यात रशियाच्या कठोर भूमिकेविषयी कायमच बोलले जात आहे. रशियाविरोधातल्या युद्धाच्या प्रक्षोभक बातम्या दाखवल्याबद्दल रशियाने गुगलला दोषी ठरवले आहे. त्यामुळे रशियाने गुगलला फ्रिज केले आहे. तसेच टांस्की न्यायालयाने गुगलला २१.१ अब्ज रुबल म्हणजेच तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गुगलला आणि युटयूबला प्रत्येक वेळी अशा बातम्या न दाखवण्याबद्दल आणि दाखवलेल्या बातम्या काढून टाकण्यासाठी कायम सतर्क केले होते. मात्र गुगलने असे न केल्यामुळे रशियाने ही पावले उचचली आहेत. त्यातही युद्धाच्या बातम्या दाखवून तरुणांना भडकवण्याचे कामही युट्यूब करत असल्याचा रशियाने गुगलवर आरोप केला आहे. कंपनीने रशियामधील बॅंक खातेही जप्त करण्यात आले असून कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया युरु आहे.
दंडाची रक्कम ही रशियातील गुगलच्या वार्षिक उलाढालीवरुन ठरवण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. युट्यूब वरील सर्व व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश गुगगला वारंवार देऊनही गुगलने कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नसल्याने अखेर रशियाने हा निर्णय घेतला आहे. आता गुगल यावर काय ऍक्शन घेणार आणि काय उत्तर देणार, हे पहावं लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस