रशियानं तैनात केलं जगातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र

पुणे, १९ डिसेंबर २०२२: रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं ओरेनबर्ग प्रदेशात इंटरकॉन्टिनेंटल हायपरसॉनिक एवनगार्ड मिसाईल सिस्टम (Intercontinental Hypersonic Avangard Missile System) तैनात केलीय. हे मिसाईल सोडल्यास ते ३० मिनिटांत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील लक्ष्यावर हल्ला करू शकते, असा दावा रशियानं केलाय. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा २७ पट जास्त आहे. म्हणजे ताशी ३३०७६ किलोमीटर आहे. एवनगार्ड मिसाईलचं वजन सुमारे २००० किलो आहे.

जर तापमान २० अंश सेल्सिअस असेल आणि हवेत ओलावा नसेल तर हे एवनगार्ड मिसाईल एका सेकंदात १० किलोमीटर अंतर पार करू शकते. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय की, या मिसाईलच्या तैनातीमुळं त्यांच्या स्ट्रॅटेजिक मिसाइल फोर्सची ताकद वाढलीय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २०१८ मध्ये हे मिसाईल अजिंक्य असल्याचं सांगितलं होतं. जगातील कोणतीही अँटी मिसाईल सिस्टम या मिसाईलवर मारा करू शकत नाही.

त्यांनी युक्रेनवर ७६ हल्ले केल्याचं रशियानं म्हटलंय. त्यापैकी बहुतेक युक्रेनियन लष्कर आणि हवाई दलानं निकामी केले होते. कारण युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रं मिळालीत. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियानं युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासून अखंड युद्ध सुरू आहे. शुक्रवारी, रशियाने युक्रेनची राजधानी कीववर ४० मिसाईल्स डागली, परंतु ती जवळजवळ सर्व युक्रेनच्या सैन्यानं रोखली. म्हणूनच रशियानं जगातील सर्वात घातक मिसाईल तैनात केलंय.

रशियानं युक्रेनवर डागलं हायपरसॉनिक क्षेपणास्त्र

रशियानं या वर्षी मार्चमध्ये युक्रेनवर दुसरं हायपरसॉनिक मिसाईल किंजल ने हल्ला केला होता. या क्षेपणास्त्राला खंजर म्हणजेच खंजीर असंही म्हणतात. हायपरसोनिक मिसाइल्स ही अशी शस्त्रं आहेत जी आवाजाच्या पाचपट वेगानं धावतात. जर एखादे मिसाईल ताशी ६१०० किलोमीटर वेगानं उडत असंल तर त्याला हायपरसॉनिक म्हणतात. वेग आणि दिशा बदलण्याची त्यांची क्षमता इतकी अचूक आणि शक्तिशाली आहे की त्यांचा माग काढणं आणि मारणं अशक्य आहे.

या देशांकडं आहेत हायपरसॉनिक मिसाईल्स

रशियाशिवाय एवनगार्डसारखी हायपरसॉनिक मिसाईल्स अमेरिका आणि चीनकडं आहेत. उत्तर कोरिया देखील विकसित होत आहे, परंतु कोणतीही पुष्टी नाही. रशियाकडं असलेले अवांगार्ड हायपरसोनिक मिसाईल ICBM मिसाईल मध्ये टाकून सोडले जाते. म्हणजे हे मिसाईल काही अंतरापर्यंत वाहून नेईल, त्यानंतर हे एवनगार्ड रौद्ररूप धारण करेल आणि शत्रूचं लक्ष्य नष्ट करेल.

हायपरसोनिक शस्त्रं दोन प्रकारची आहेत. प्रथम- ग्लाइड व्हीकल्स (Glide Vehicles) म्हणजे हवेत तरंगणारी. दुसरे- क्रूझ मिसाईल. सध्या बहुतेक देश ग्लाईड व्हीकल्स (Glide Vehicles) बनवत आहेत. त्यांना मिसाईल लावून सोडलं जातं. ठराविक अंतरानंतर मिसाईल वेगळं होतं. त्यानंतर ग्लाईड व्हीकल्स सहजपणे उडणाऱ्या लक्ष्यावर हल्ला करतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा