रशियाचा युक्रेनवर घणाघात सुरु, तर युक्रेनने लायमॅन घेऊन दिले प्रत्युत्तर

रशिया, ३ ऑक्टोबर २०२२ : रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा २२२ वा दिवस आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाने सध्या सगळ्या जगालाच हादरवून टाकले आहे. त्यातच रशियन सैन्याने ड्रोनच्या मदतीने युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांचे गृहनगर व इतर भागांना लक्ष्य केले. युक्रेनने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत महत्त्वाचे शहर लायमॅनवर पुन्हा वर्चस्व मिळवले. आता लायमॅन हातून निसटल्याने रशियाला झटका बसल्याचे मानले जाते. रशियाने दोन दिवसांपूर्वी युक्रेनच्या चार प्रांताचे विलीनीकरण केल्यामुळे युद्ध आणखी भडकले आहे.

सध्या डोनाबासवर रशियाची नजर असून युक्रेनच्या मोठ्या भागांचे रशियात विलीनीकरण केले जाईल. आता आमची नजर डोनाबासवर असल्याचे रशियाने सांगितले आहे. युद्ध लवकर थांबणार नसल्याचे संकेतही रशियाने दिले. तत्पूर्वी, रशियाचा ताबा असलेल्या डोनेस्क क्षेत्रातील दोन गावांची मुक्तता केल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे. रशियाच्या सैन्याला घेराव घालण्यात आला असला तरी एका आण्विक प्रकल्पाच्या प्रमुखाचे रशियाने अपहरण केल्याचा आरोपही युक्रेनने केला.

रशियाने केलेल्या हल्ल्याचा नाटोने निषेध केला आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांची हालत सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या खराब झाली आहे. याचे आगामी परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत, हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा