नवी दिल्ली, १५ जुलै २०२३: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी, या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा २०२३ साठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाची घोषणा केली. ज्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. त्याचबरोबर रिंकू सिंग आणि प्रभसिमरन यांचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा एकदिवसीय विश्वचषकादरम्यान होणार आहेत, त्यामुळे बी संघाची निवड करण्यात आली आहे. आशियाई खेळ २०२३ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धा २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. सर्व सामने ‘झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी पिंगफेंग क्रिकेट फील्ड’ येथे खेळवले जातील.
भारतीय संघ: रुतुराज गायकवाड (क), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मान (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, शिवम मावी प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक)
स्टैंडबाय खेळाडूः यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड