एस. सोमनाथ इस्रोचे नवीन प्रमुख, रॉकेट इंजीनियरिंग तज्ञ म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022: विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) चे संचालक आणि इस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ एस. सोमनाथ (S. Somanath) यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) नवीन प्रमुख बनवण्यात आलंय. तिरुअनंतपुरमस्थित व्हीएसएससीचे संचालक एस. सोमनाथ हे देशातील सर्वोत्तम रॉकेट तंत्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता आहेत.

व्हीएसएससीपूर्वी एस. सोमनाथ हे लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर (LPSC), तिरुवनंतपुरमचे संचालक देखील आहेत. इस्रोच्या रॉकेटच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे. सोमनाथ लाँच व्हेईकल डिझाईन करण्यात मास्टर आहे. लाँच व्हेईकल सिस्टीम इंजिनीअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स आणि पायरोटेक्निक्समध्ये ते तज्ञ आहेत.

ISRO प्रमुख होण्यापूर्वी ते GSAT-MK11 (F09) अपग्रेड करण्यात गुंतले होते. जेणेकरून हेवी कम्युनिकेशन सॅटॅलाइट अवकाशात सोडता येतील. याशिवाय एस. सोमनाथ हे GSAT-6A आणि PSLV-C41 मध्ये सुधारणा करण्यात गुंतले होते जेणेकरून रिमोट सेन्सिंग उपग्रह योग्यरित्या प्रक्षेपित करता येतील.

एस. सोमनाथ यांनी महाराजा कॉलेज, एर्नाकुलम येथून प्री-डिग्री प्रोग्राम पूर्ण केला आहे. यानंतर त्यांनी केरळ विद्यापीठातील टीकेएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, क्विलन येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केलं. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (IISc) मधून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. रॉकेट डायनॅमिक्स आणि कंट्रोलमध्ये त्यांचं कौशल्य आहे.

1985 मध्ये पदवीनंतरच एस. सोमनाथ विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये रुजू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात ते PSLV प्रकल्पासोबत काम करत राहिले. त्यानंतर त्यांना 2010 मध्ये GSLV Mk-3 रॉकेटचे प्रकल्प संचालक बनवण्यात आलं. 2015 मध्ये ते LPSC चे प्रमुख बनले. 2018 मध्ये ते VSSCचे संचालक झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा